छत्रपती संभाजी नगर:- बहुजन आवाज न्यूज: विवाहबाह्य संबंध ठेवणे एका विवाहित तरुणीला चांगलेच महागात पडले. पती, मुलाची परवा न करता ती एका विवाहित तरुणाच्या प्रेम संबंधात आली. व्हिडीओ कॉलवरही दोघे बोलू लागले. हि बाब तिच्या पतीला कळाल्यानंतर त्याने तिला समजून सांगितले. त्यानंतर तिने अफेअर बंद केले, पण त्यानंतर त्याचा त्रास सुरु झाला. तो प्रेम हट्टाला पेटला. त्यातच त्याच्या घरीही अफेअर माहित झाल्याने त्याच्या पत्नीनेही माझा संसार खराब करतेस काय, असा जाब विचारला आणि जीवे मारण्याची धमकी दिली. वाळूज महानगरात हा प्रकार समोर आला आहे आणि आता विवाहितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिच्या प्रीयाकारासह त्याच्या पत्नी आणि मेव्हाण्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
वाळूज महानगरात २८ वर्षीय काजल (नाव बदलले आहे ) पती, लहान मुलासह राहते. मुलगा आजारी पडल्याने व डॉक्टरांनि शाश्त्राक्रिया करण्याची आवश्यकता सांगितल्याने ती अहिल्यानगर जिल्ह्यातील सासरी गेली होती. तिथे मुलावर एका रुग्णालयात उपचार करण्यात आले. या रुग्णालयातील किरण नावाच्या कर्मचाऱ्यासोबत काजल ची ओळख होऊन मैत्री झाली. मैत्री वाढत जाऊन दोघात प्रेमसंबध निर्माण झाले. काजल वाळूज महानगरात परतल्यानंतरही दोघातील प्रेम प्रकरण सुरूच होते. किरण तिला सातत्याने फोन करत होता. दोघात गप्पा होत होत्या सोशल मिडीयावर व्हिडीओ कॅल हि होयचे. पतीच्या लापुय छपून हे सारे होत असताना एकेदिवशी तिच्या या प्रेमप्रकरणाची भनक पतीला लागली. त्याने काजलला समजून सांगितले त्यामुळे तिने किरन शी संबंध बंद केला. मात्र किरण प्रेम हट्ट सोडायला तयार होत नव्हता. तो तिला सतत कॉल करू लागला. दोघांच्या या वादात त्याच्या घरी सर्व माहित झाले.
गुरवारी ७ नोव्हेंबर सकाळी ११:०० वाजता किरणच्या पत्नीने काजलला कॉल केला आणि तुझ्यामुळे माझ्या संसाराचे वाटोळे झाले. मी तुला जिवंत सोडणार नाही, असे धमकावले. किरण च्या मेव्हानिनेही काजलला कॉल केला तू माझ्या बहिणीच्या संसाराचे वाटोळे करू नको अन्यथा तुला जीवे मारून टाकू , अशी धमकी तिने काजलला दिली. प्रेम हट्टाला पेटलेला किरण त्यात त्याची पत्नी व मेव्हणी कॉल करून धमकी देत असल्याने वैतागलेल्या काजलने वाळूज एम आय डी सी पोलीस ठाणे गाठून तिघांविरुद्ध तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास केला जात आहे.